जेजुरीत आत्ता लगेच लॉकडाऊनची शक्यता नाही: पुनम शिंदे

पुरंदर, दि. ७ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्र मध्ये दुकाने पूर्ण बंद करण्याचा नगरपरिषदेचा सध्यातरी कोणताच विचार नसल्याचे नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पुनम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे .

पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे शहर असलेल्या सासवडमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जेजुरी शहर काही दिवस पूर्ण बंद करण्यात यावे. अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर जेजुरी नगरपरिषद पुढील काही दिवस पूर्ण लॉकडाऊन पाळत बंद ठेवण्यात येणार असल्याची अफवा सोशल माध्यमातून पसरत होती.

काल याबाबत जेजुरीच्या मुख्याधिकारी पुनम शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, लोकांकडून अशा प्रकारची मागणी होत असली तरी सध्यातरी जेजुरी नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर लोकांनी सुद्धा स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ दुकाने बंद ठेउन अपेक्षित यश येणार नाही. यासाठी लोकांनी सजग असायला हवे. बाहेर फिरताना, कामाला जाताना, बाजारात दुकानात खरेदीला जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क वापरले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करणे आणि लोकांना रोगापासून दूर ठेवणे ही तारेवरची कसरत शासनाला करावी लागत आहे. त्यामुळे लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घेत शासनाला तर सहकार्य करावे व स्वतः रोगापासून दूर राहावेa. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था व आपले नागरीक दोन्ही सुरक्षित राहतील. सध्या लगेच लॉक डाऊन किंवा जनता कर्फ्यू करण्याची नगरपरिषदेची कोणती योजना नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा