मुंबई, १० ऑक्टोबर २०२२: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊतांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
Patra Chawl land scam case | Judicial custody of Shiv Sena leader Sanjay Raut extended till 17th October pic.twitter.com/ctSgqEzC3N
— ANI (@ANI) October 10, 2022
न्यायालयाने वेळे अभावी आजच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी आता ती १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवली आहे. त्यामुळे राऊतांचा मुक्काम आता १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच असणार आहे.
नवे चिन्ह शिवसेनेसाठी क्रांतिकारक
सुनावणीपूर्वी संजय राऊतांना चिन्ह गेल्याबाबत विचारले असता त्यांनी ठोस प्रतिक्रिया दिली आहे. चिन्ह गेल्याची ही काही पहिली वेळ नाही, काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यादेखील अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचेही चिन्हे ३ वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे हे काही नवीन नाही. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवसेनेच्या या वर्षीच्या दसरा मेळाव्यात न्यायालयीन कोठडीत असल्याने हजर राहू न शकल्याने आज शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते राऊत यांना भेटण्यासाठी न्यायालय परिसरात उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.