शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा नाहीच! न्यायालयाने ४ ऑक्टोबर पर्यंत कोठडीत केली वाढ

पुणे, १९ सप्टेंबर २०२२ : मनी लॉन्ड्रीग आरोप प्रकरणात दीड महिन्याहून अधिक काळापासून न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विशेष पीएमपीएल न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

विशेष पीएमएलए कोर्टाने पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केलीय. कोर्टाने संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवलीय. संजय राऊत यांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयाने त्यांना ४ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यामुळे राऊत यांना सप्टेंबर महिना जेलमध्ये मुक्कामी राहावे लागणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा