शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला

मुंबई, २७ सप्टेंबर २०२२ : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा अर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम पुन्हा वाढला आहे. पत्राचाळ घोटाळ्यात सुमारे दोन महिन्यापासून तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

या सुनावणी दरम्यान संजय राऊत यांना दिलासा मिळाला नसून न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यालाही संजय राऊत उपस्थित राहू शकणार नाहीत.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाला प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राउत यांचा मुक्काम हा अर्थर रोड कारागृहामध्ये मध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर जोरदार सुनावणी झाली. यावेळी १० ऑक्टोबर पर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली होती. विशेष न्यायालयाने यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा