भारतात आर्थिक मंदी येणार नाही.- ज्यो बायडन

पुणे;२६ जुलै २०२२ : आधी कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले. नंतर आलेली महागाई. यामुळे आता संपूर्ण जग आर्थिक महागाईच्या चिंतेने ग्रासले आहे. देशातली रोजची वाढती आव्हाने यामुळे सर्व जग मंदीत जाण्याची शक्यता आहे. मात्र यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक मंदीबाबत मोठं विधान केले आहे. भारत वगळता बहुतांश मोठ्या देशांना मंदीचा फटका बसेल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या मंदीचा फटका अमेरिकेला बसणार नाही, असंही बायडेन यांनी सांगितलं.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन असंही म्हणाले, “माझ्या मते, अमेरिका सध्या मंदीत जात नाहीये. मात्र, अमेरिकेतील बेरोजगारीचा दर अजूनही इतिहासातील सर्वात कमी म्हणजेच 3.6 टक्के एवढा आहे. या सर्व परिस्थितीत आम्ही गुंतवणूक करणाऱ्यांचा शोधात असल्याचे म्हटले आहे. माझी आशा आहे की, आपण या वेगवान विकासापासून एका स्थिर विकासाकडे जाऊ. यामुळे अर्थव्यवस्थेत थोडी मंदी दिसून येऊ शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की अमेरिकालाही मंदीचा फटका बसेल.

जो बायडन यांच्या या विधानामध्ये किती तथ्य आहे, हे आर्थिक गणितावरुन समजेल. पण सध्या तरी भारताला महागाईची झळ बसते आहे. ज्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार, याकडे जनतेचे लक्ष आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा