राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ९९% मतदान, सनी देओल आणि सत्येंद्र जैन यांच्यासह या १३ सदस्यांनी केले नाही मतदान

Presidential Election 2022, १९ जुलै २०२२: देशाचा पुढील राष्ट्रपती कोण असेल हे ठरवण्यासाठी खासदार आणि आमदारांनी सोमवारी मतदान केले. देशाचे १५ वे राष्ट्रपती निवडण्याच्या शर्यतीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा आहेत. या निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे. निकालात निवड झालेल्या उमेदवाराचा २५ जुलै रोजी शपथविधी होईल.

राजकीय गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. एकूण ४८०० मतांपैकी ४,७९६ मते पडल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. म्हणजेच एकूण १३ सदस्यांनी (खासदार आणि आमदार) मतदान केले नाही. म्हणजे एकूण ९९ टक्के मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री आणि खासदारांनी संसद भवनात मतदान केले.

ज्या ८ खासदारांनी मतदान केले नाही

१. अतुल सिंग (तुरुंगात)
२. संजय धोत्रे (ICU मध्ये)
३. सनी देओल (परदेशात ऑपरेशनसाठी)
४. गजानन कीर्तिकर
५. हेमंत गोडसे
६. फजलुर रहमान
७. सादिक मोहम्मद
८. इम्तियाज जलील

याशिवाय काही आमदारांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले नाही. यामध्ये कोणाच्या नावांचा समावेश आहे ते पहा-

१. नैना सिंह चौटाला, हरियाणातील जेजेपी आमदार (परदेशात आहेत)
२. राजकुमार राऊत (भारतीय आदिवासी पक्ष, राजस्थान)
३. भंवरलाल शर्मा (काँग्रेस, राजस्थान)
४. सत्येंद्र जैन (आप, दिल्ली, तुरुंगात)
५. हाजी युनूस (आप, दिल्ली)

छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, सिक्कीम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी म्हणाले की संसद भवनात एकूण ९९.१८% मतदान झाले. ७३६ मतदारांपैकी (संसदाचे ७२७ सदस्य आणि विधानसभेचे ९ सदस्य) ७३० मतदारांनी (संसदाचे ७२१ सदस्य आणि विधानसभेचे ९ सदस्य) मतदान केले.

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढत आहे. पण द्रौपदी मुर्मू जिंकण्याची शक्यता आहे. आता २१ जुलैला निकाल लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा