या आहेत भारतातील सर्वात मोठ्या १० कंपन्या, एवढं आहे मार्केट कॅपिटलायझेशन


मुंबई, १४ डिसेंबर २०२०: भारतात हजारो कंपन्या आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या कंपन्या भारताच्या पहिल्या १० मध्ये आहेत? तसं, शेअर बाजाराच्या हालचालीनुसार कंपन्यांच्या मार्केट कॅप्स मध्ये चढ-उतार होत असतो. आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या १० कंपन्यांची नावं आणि मार्केट कॅपबद्दल सांगणार आहोत.

मार्केट कॅपनुसार ११ डिसेंबर २०२० रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १२,७१,४३८.२३ कोटी रुपये आहे. दुसऱ्या स्थानी आयटी कंपनी ‘टीसीएस’ आहे, जिचं मार्केट कॅप १०,४४,४५७.५२ कोटी रुपये आहे.

तिसर्‍या क्रमांकाची कंपनी ‘एचडीएफसी बँक’ असून ११ डिसेंबर रोजी ७,६१,१२२.९१ कोटी रुपयांचं मार्केट कॅप आहे. चौथ्या क्रमांकावर ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ आहे, जिचं मार्केट कॅप सध्या ५,५७,७१४.१७ कोटी रुपये आहे. ५ व्या क्रमांकावर आयटी फर्म ‘इन्फोसिस’ असून कंपनीचं मार्केट कॅप ४,९५,४०१.०४ कोटी आहे.

‘एचडीएफसी लिमिटेड’ देशातील सहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. एचडीएफसीचं मार्केट कॅप ४,१३,१७१.१९ कोटी रुपये आहे. कोटक महिंद्र बँक सातव्या क्रमांकावर असून या बँकेचं मार्केट कॅप ३,८०,२४७.४३ कोटी रुपये आहे.

११ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार ‘आयसीआयसीआय बँक’ आठव्या क्रमांकावर आहे, जिचं मार्केट कॅप ३,५५,५२९.५१ कोटींवर पोचलं आहे. ९ व्या क्रमांकावर ‘बजाज फायनान्स’ असून कंपनीचं मार्केट कॅप २,९१,८३९.०७ कोटी रुपये आहे. अखेरीस, ‘एअरटेलची टेलिकॉम’ कंपनी १० व्या क्रमांकावर आहे, जिचं मार्केट कॅप २,७४,९८७.३७ कोटी आहे.


गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन (मार्केट कॅप) १,५३,०४१.३६ कोटी रुपयांनी वाढलं. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ (एचयूएल) आणि ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ (आरआयएल) या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा