हे आहेत क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विक्रम

पुणे, ११ डिसेंबर २०२०: क्रिकेट विश्वात अनेक खेळाडूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्यामुळे त्यांची किर्ती सातासमुद्रापार गेली आहे. आज आपण आशाच खेळाडूंबद्दलचे गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड ने घेतलेली दखल पाहणार आहोत.

सर्वात महागडी बॅट

क्रिकेटमधील या अनोख्या बॅटचा जेव्हा लिलाव झाला होता तेव्हा तिची बोली तब्बल १.१ कोटींची लागली होती आणि ती बॅट होती. २०११ च्या वर्ल्डकप फायनल मधे शेवटी सिक्स लगावणारी. हि बॅट आर.के. ग्लोबल शेअर्स अँड सेक्युरिटिज लिमिटेड (इंडिया) ने विकत घेतली आहे. आता तुम्हाला लक्षात आले आसेलच हा रेकाॅड कोणाची खेळाडूच्या नावावर आहे. बरोबर भारतीय संघचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नावावर हा अनोखा विक्रम आहे.

सर्वाधिक वयाचा पदार्पण करणारा खेळाडू

उस्मान गोकेर यांच्या नावावर हा विक्रम आहे. २९ ऑगस्ट २०१९ मधे उस्मान गोकेर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे पदार्पण केले. वयाची ५९ वर्षे १८१ दिवस पुर्ण केल्या नंतर उस्मान यांनी रोमनियच्या विरोधात तुर्की कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे पदार्पण केले. तर याआधी बोस्टावनाचे जेम्स मोसेस यांनी ५३ वर्ष २८५ दिवस पुर्ण केल्या नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे पदार्पण केले होते. तर २०१९ पर्यंत त्यांच्याच नावावर हा विक्रम होता.

फास्ट बाॅल

पाकिस्तानचा माजी फास्ट बाॅलर शोएब अख्तर ने क्रिकेट इतिहासात सर्वात फास्ट बाॅल फेकला होता. २००३ च्या वर्ल्डकप मधे बाॅलिंग करताना अख्तरने १६१.३ KM/M(१००.२३ Mph) च्या स्पीडने बाॅल फेकला होता. जे आजून पर्यंत कुणीही फेकला नसून हा रेकाॅर्ड शोएबच्याच नावावर आहे.

एका ओव्हर मधे सहा सिक्स लगावणारा कमी वयाचा क्रिकेटर

२००३ मधे वयाच्या १३ व्या वर्ष आणि २६५ दिवस पुर्ण केल्या नंतर इंग्लंडचा अँथनी मॅकहमॅहाॅन ने एकाच ओव्हर मधे सहा सिक्स लगावणारा कमी वयाचा बॅट्समन आहे. त्यामुळे त्याची गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड मधे दखल घेतली.

हायस्ट क्रिकेट बाॅल कॅच

ऑस्ट्रेलियाची विकेट किपर एलिसा हेलीच्या नावावर ‘हायस्ट कॅच ऑफ अ क्रिकेट बाॅल’ हा गिनिज वर्ल्ड रेकाॅर्डची नोंद आहे. एमसीजी मैदानावर एलिसा ड्रोनने तब्बल ८० मीटर उंचीवरून फेकलेला बाॅल अलगद झेलत हा विक्रमाची नोंद केली.

एका डावात दहा विकेट्स, तेही सर्व बोल्ड…

जाॅन विस्डेन हे जगातील एकमेव असे बाॅलर आहेत. ज्यांचा नावावर क्रिकेट इतिहासात दहा विकेट्स आहेत. १८५० मधे लाॅडर्सवर उत्तर विरूद्ध दक्षिण यांच्यातील सामन्यात हा विक्रम केला.

सर्वात महागडी कॅप

क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी कॅपचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वाॅर्न च्या नावावर आहे. त्याचा कॅपचा लिलाव झाला आसताना त्यावर ५ कोटीं रुपयांची बोली लागली होती. ऑस्ट्रेलियातील फटका बसलेल्या नागरिकांसाठी त्यांने हे पैसे दान केले होते. या आधी २००३ मधे डाॅन ब्रॅडमन यांच्या कॅपसाठी ३ कोटींची बोली लागली होती.

टेस्ट मधील एका सामन्यात सर्वाधिक धावा

श्रीलंकेच्या पुरूष संघाने क्रिकेट इतिहासात टेस्ट मधे एका डावात सर्वाधिक धावसंख्या नोंदवली आहे. श्रीलंकेने १९९७ मधे भारता विरूद्ध खेळलेल्या ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान ६ बाद ९५२ धावा केल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा