मुंबईत लसीकरणाची तयारी पूर्ण, ही आहेत ठिकाणे

मुंबई, २ जानेवारी २०२१: केंद्र सरकार भारतीयांसाठी कोरोना लसी ची घोषणा करणार याकडे १३० कोटी जनतेचे लक्ष लागले आहे. याबाबत भारतीयांची प्रतीक्षा संपलेली आहे. सीडीएससीओ विशेष समितीच्या बैठकीमध्ये कोरोना लसीला परवानगी देण्यात आली असून या संदर्भात काल बैठक झाली. यात सिरम इन्स्टिट्यूट च्या कोविशील्ड लसीला मान्यता देण्यात आली.
अशी आहे मुंबईमध्ये तयारी
मुंबई मध्ये एकूण चार मेडिकल कॉलेज आणि चार मुंबई महापालिकेचे हॉस्पिटल तयार ठेवण्यात आलेली आहे. कोरोना लसीकरणासाठी सायन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटल यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर ज्या चार मेडिकल कॉलेजचा समावेश करण्यात आला आहे त्या ठिकाणी देखील लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
मात्र ही चार केंद्रं आणि चार कॉलेजेस जर लसीकरणाच्या कार्यक्रमात कमी पडली तर इतरही रुग्णालय तयार ठेवण्यात येणार आहेत. लसीकरणाची तयारी कशी असेल तर, याबाबत लस देणारे जे कर्मचारी आहे त्यांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक लसीकरण केंद्रावरती ४ सुपरवायझर उपस्थित असणार आहेत. याव्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेचे चार अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. याच बरोबर एक व्हॅक्सिनेशन ऑफिसर असेल.
अर्थातच या लस साठवण्याच्या जागा संवेदनशील असणार आहेत. यादरम्यान कोणताही गोंधळ किंवा गडबड होऊ नये तसेच कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी या जागांची माहिती कोणालाही देण्यात आलेली नाही. सध्या उपस्थित असलेल्या माहितीनुसार कांजूरमार्ग या ठिकाणी एक कोल्ड स्टेशन तयार करण्यात आले आहे. याशिवाय इतर रुग्णालयांमध्ये देखील लसी चा साठा केला जाईल.
आजपासून होणार ड्रायरन
दरम्यान आज पासून प्रत्येक राज्यामध्ये ड्रायरन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येकी तीन आरोग्यकेंद्र निवडण्यात आलेली आहेत. म्हणजे लसीकरणाची रंगीत तालीम असते मात्र, प्रत्यक्षात कोणालाच लस टोचण्यात येत नाही. लसीकरणासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे का? याची चाचपणी करण्यासाठी हे ड्रायरन घेण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा