‘ही’ आहेत तुमचे ‘शुक्राणू’ घटण्याची कारणे…

पुणे, १५ डिसेंबर २०२०: आधुनिक काळात आपल्या जीवन शैलीमधे बरेच बदल होत असतात आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत आसतो. आज आपण पुरूषांच्या स्पर्म अर्थात शुक्राणू बद्दल माहिती घेणार आहोत.

पुरूषांमधील घटती शुक्राणूंची संख्या एक चिंतेचा विषय आहे. कारण, शुक्राणूंचा संबंध थेट प्रजनन क्षमतेशी येतो. खाण्यापिण्याच्या सवयींवर पुरूषांचे स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या किती आहे ते अवलंबून असते.खाण्यात चरबीयुक्त पदार्थ जास्त आले तर स्पर्म काउंट कमी होतो, असं अमेरिकेतल्या फर्टिलिटी क्लिनिकच्या अभ्यासातून समोर आलं आहे. तर शरीरात ओमेगा-३ फॅटी ॲसिड पुरेसं आसंल तर त्याचा स्पर्म काउंट चांगला राहतो.

तुमच्या शुक्राणूंची संख्या घटू नये म्हणून ही काळजी घ्या…..

तंग अंडरवेअर घालू नका.

लैंगिक संसर्गापासून दूर रहा.

फिट रहा, पोट सुटू देऊ नका.

व्यायाम करा, पण त्याचा अतिरेक नको.

दारूचे अजिबात सेवन करू नका.

तुम्ही ७-८ तास झोपत नसाल तर तुमच्या प्रजनन क्षमतेचे वाईट दिवस सुरू झालेत असं समजावं.

जे ६ तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांच्या प्रजनन क्षमतेत घट होते.

गरम पाण्यानं आंघोळ करू नये, त्यामुळं अंडकोषाचं तापमान वाढतं आणि त्याचा थेट परिणाम स्पर्म काउंट वर होतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा