हे लोक होते सीडीएस रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टर मध्ये उपस्थित

पुणे, 9 डिसेंबर 2021: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले.  या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांचे कुटुंबीय यांच्यासह 14 जण होते, ज्यामध्ये सर्व  14 जणांना प्राण गमवावे लागले. ज्या भागात हे हेलिकॉप्टर कोसळले तो भाग पूर्णपणे जंगलाचा आहे. काल संध्याकाळी 6 वाजता राजनाथसिंह यांनी याची पुष्ठी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावतही होत्या.  अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत, त्यांची पत्नी, एक ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी, आणखी एक अधिकारी आणि दोन पायलट उपस्थित होते.
 ग्रुप कॅप्टन पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर कुलदीप अशी या हेलिकॉप्टर चे पायलट करणाऱ्या दोन वैमानिकांची नावे आहेत.  सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत दिल्ली ते सुलूर प्रवास करणाऱ्या लोकांची ही यादी आहे.
 या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर सर्व मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात खराब हवामानामुळे झाला आहे.
हे लोक सीडीएस रावत यांच्यासोबत उपस्थित होते
 दिल्लीहून सीडीएस रावत, त्यांची पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर लिडर, हरजिंदर सिंग (लेफ्टनंट कर्नल), एनके गुरसेवक सिंग (पीएसओ), एनके जितेंद्र कुमार (पीएसओ), एलएनके विवेक कुमार, एलएनके बी साई तेजा, हवालदार सतपाल आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा