पुणे, दि. २३ जुलै २०२०: पुण्यातील कोरोना परिस्थिती हि अनलाॅक मुळे फार वाईट झाली असून आधी दुप्पटीने वाढणारे रुग्ण हे तिप्पटीने वाढण्यास सुरवात झाली आहे. तर प्रशासनाची आरोग्य यंत्रणा या कोरोनाच्या माहामारी समोर कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. आज घडीला कोरोना रुग्णांना पुण्यात बेड्स मोठ्या आडचणीने उपलब्ध होत आहेत. तर मग बाकी आजरांच्या रुग्णांचे काय ?
पुण्यात ७ ते ८ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने काल रात्री कुटुंब आणि मित्रांसह पुण्यातील अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. परंतु त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मनोज कुंभार असं या रुग्णाचं नाव असून त्याला निमोनियाचा त्रास होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली होती. त्रास वाढल्याने नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि नातेवाईक रुग्णवाहिकेसह वेगवेगळ्या रुग्णालयात दिवसभर चकरा मारत राहिले. मात्र अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर सुद्धा त्याला बेड उपलब्ध झालाच नसल्यामुळे वैतागलेल्या रुग्णाने संतप्त नातेवाईकासह अलका चौकात बसून ठिय्या आंदोलन केले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक ठिकाणाहून संतप्त प्रतिक्रिया, आक्रोश आणि संवेदना व्यक्त झाल्या. यानंतर नातेवाईकांची समजूत काढून त्यांना तात्काळ महापालिकेच्या रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. रात्री उशिरा विश्रांतवाडीच्या रूग्णालयात रुग्णला दाखल करण्यात आलं खरं पण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमावण्याची वेळ आली.
ज्यामुळे हा मनोज जो की कोरोना विषाणूमुळे नसून दुस-या आजाराचा रुग्ण होता परंतू अशा रूग्णांच्या उपचारासाठी मोठी आडचण उद्वभवताना दिसत आहे. तरी ही अशा एका मनोजची नाही कहाणी नाहीतर अनेक भरपूर रुग्णांवर व त्यांच्या कुंटूबावर अशी वेळ येऊन गेली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी