गोल पोस्ट गुन्हा खळद येथे मोटार सायकल चालक महिलेस चोरट्यांनी लुबाडलं

खळद येथे मोटार सायकल चालक महिलेस चोरट्यांनी लुबाडलं

पुरंदर, २४ नोव्हेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील खळद राहणारी व जेजुरी हॉस्पिल मध्ये काम करणाऱ्या एका महिलेस कामावरून घरी जाताना मोटारसायकल आडवी लावून गळ्यातील मंगळसुत्र व पर्स चोरून नेली आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह एकूण बत्तीस हजार नवसे रुपये किमतीच्या वस्तुची चोरी झाली असल्याची तक्रार सुजाता कामठे यांनी दिलीय.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे सात वाजता तक्रार दार कामठे या जेजुरी येथील आपल्या कामाच्या ठिाणांपासून घरी निघाल्या होत्या. त्या बापदेव मळा याठिकाणी कच्या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या मोटार सायकल स्वरानं मोटारसायकल आडवी लावून त्यांचा रस्ता आडवला. यानंतर त्यातील एकानं त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. त्यांची पर्स ही चोरट्यांनी पळवून नेली.

यामध्ये आर्धा तोळा वजनाचे मंगळसूत्र लहान मुलीच्या पट्ट्या, एम आय कंपनीचा मोबाईल. असा ३२,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरांनी हिसकावून नेला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतीनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version