डोंबिवलीत घातलं चोरांनी थैमान…! नागरिकांना सावध राहण्याचा पोलीसांचा इशारा

डोंबिवली , २९ जुलै २०२० : कोरोनाचे थैमान कमी होताच डोंबिवलीत आता चोरांनी थैमान घालायला सुरूवात केली आहे. डोंबिवलीच्या पूर्व पश्चिम आणि ग्रामीण भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात दुचाकी, चार चाकी चोरी, रिक्षा चोरी आणि घरफोड्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये रहिवासी सुरक्षेसाठी त्यांच्या गावी गेल्यामुळे त्याचाच फायदा घेऊन चोरांनी अनेक ठिकाणी घरफोड्या करायला सुरूवात केली आहे . आता पर्यत सुमारे 25 ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.

हातात पैसा नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि त्यामुळे या कोरोनाच्या संकटात अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदिरा नगर , त्रिमुर्ती नगर या वस्तीमधील एकाच दिवशी सहा घर फोड्या झाल्या आहेत .

नोकरी नसल्याने हातात पैसा नाही यातच कोरोनाशी सामना करताना रुग्णालयाकडून होणारी लूट आणि अशातच जर चोरीच्या घटना होत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांनी सावध राहावे आणि जर अशी घटना घडली तर कोणतीही दिरंगाई न करता पोलीसांना कळवावे असे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले .

न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा