पुणे, १६ ऑगस्ट, २०२२ : सध्याचे वातावरण जरा विचित्रच आहे. कधी ऊन कधी पाऊस. त्यामुळे वातावरणाबरोबरच मनाच्या विचारांचेदेखील स्थित्यंतर होत आहे. अनेक जण लहान वयात आत्महत्येचा विचार करत आहे. त्यामुळे अशांना समजावणे हे महत्त्वाचे आहे. अशांसाठी काही सोप्या टिप्स…
१. रोज सकाळी पहाटे उठून फिरायला जा. मोकळ्या वातावरणात आणि फ्रेश हवेमुळे मनातले निराश विचार झटकून टाकण्यास मदत होईल.
२. आवडता सिनेमा किंवा विनोदी चित्रपट पाहून मनाला बरं वाटेल.
३. एखादं आवडतं गाणं ऐका किंवा एखादं वाद्य वाजवा. ते तुम्हाला मनसोक्त आनंद देईल.
४. आवडतं पुस्तक वाचा.
५. एखादा ट्रेक करा किंवा एखाद्या सहलीला जा. जेणेकरुन वातावरण बदलामुळे तुमचं मन हलकं होईल.
६. एखाद्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जा किंवा घरी आवडता पदार्थ स्वत: तयार करुन खा. ज्यामुळे तुमचे मन त्यात लागेल.
७. एखादा हास्य क्लब किंवा नवीन ग्रुप जॉईन करा. ज्यामुळे नवनवीन माणसं भेटल्यामुळे नवीन विचार मनात येत राहतील.
८. नवीन कपडे खरेदी करा किंवा शॉपिंगला जा. प्रत्येक वेळी खरेदी केलीच पाहिजे, असा आग्रह नसतो. विंडो शॉपिंगसुद्धा काही वेळा विचार बदलण्यासाठी कारणीभूत ठरतात.
९. घरी एखादी पार्टी करुन मित्र-मैत्रिणींना बोलवा. ज्यामुळे तुम्हाला पार्टीत आनंद मिळेल.
१०. सुरक्षित पर्याय म्हणून एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन समुपदेशन करुन घ्या. जेणेतरुन तुमच्या मनातल्या विचारांचे पालट होईल, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस