गोल पोस्ट महाराष्ट्र स्वराज्य सप्ताहाचा तिसरा दिवस संपन्न

स्वराज्य सप्ताहाचा तिसरा दिवस संपन्न

नागपूर, १६ फेब्रुवारी २०२४ : स्वराज्य सप्ताह निमित्त पश्चिम नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हंसकृपा कॉन्व्हेन्ट झिंगाबाई टाकळी येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्र काढण्याकरीता हंसकृपा कॉन्व्हेन्टच्या लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या सर्व स्पर्धकांना शहराध्यक्ष प्रशांत पवार, पश्चिम नागपूर अध्यक्ष योगेश ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी विजय कुमार शिंदे, दुर्गदास जिचकार, विजय चौहान, अनिल गजभिये, सोपान मिरचे, लीलाधर राऊत, रत्नाकर दुर्गे, हेमंत तिराले, अमोल कांबळे आदीं पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

error: Content is protected !!
Exit mobile version