इमरान खान सरकारविरोधात विरोधी पक्षांची तिसरी मोठी रॅली…

क्वेट्टा (पाकिस्तान), २६ ऑक्टोबर २०२०: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षांचा वेढा अजूनही कायम आहे. रविवारी पाकिस्तानच्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एका व्यासपीठावर एकत्रित येऊन देशव्यापी मोहीम हाती घेतली असून ही तिसरी मोठी रॅली दक्षिण पश्चिम बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे आयोजित केली होती.

या महिन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानच्या ११ विरोधी पक्षांनी डेमोक्रेटिक मूवमेंट (पीडीएम) च्या नावाने ही युती केली होती . विरोधी पक्षांच्या या युतीने गुजरनवाला आणि कराचीमध्ये एकामागून एक मोर्चे काढले आहेत. क्वेट्टाच्या अय्यूब स्टेडियममध्ये रॅली सुरू होताच शहरात स्फोट झाला, त्यात तीन लोक ठार आणि सात जण जखमी झाले. ही घटना रॅलीच्या ठिकाणापासून ३५ ते ४० मिनिटांच्या झाली.

तथापि, या स्फोटातील घटनेकडे दुर्लक्ष करून विरोधी नेत्यांनी सभेत हजेरी लावली, ज्यात पाकिस्तान लोकशाही चळवळीचे अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान आणि युतीतील इतर प्रमुख नेते यांचा समावेश होता.

लष्करप्रमुख बाजवा यांच्यावर नवाज शरीफ यांनी केली जोरदार टीका

व्हिडिओ लिंकद्वारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) चे सर्वेसर्वा नवाज शरीफ यांनी या रॅलीला संबोधित केले. त्याच वेळी, नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी क्वेट्टा येथील मोर्चात इम्रान खान सरकारच्या अपयशावर हल्ला केला, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यावर नवाज शरीफ यांनी निशाणा साधत इम्रान खान यांच्यावरही टीका केली.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीबद्दल पाकिस्तानचे लष्करप्रमुख जावेद बाजवा आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे जनरल फैज हमीद यांना जबाबदार धरले. नवाझ शरीफ म्हणाले, ‘जनरल बाजवा तुम्हाला २०१८ च्या निवडणूकीतील धांदल, संसदेतील घोडे व्यापार, इमरान नियाझी यांना पंतप्रधान बनविणे, घटना व कायदे मोडून पाकिस्तानला भूक आणि दारिद्रयाच्या टोकाला लावण्यासाठी उत्तर द्यावे लागेल.’ नवाझ शरीफ यांनीही आयएसआय प्रमुखांवर हल्ला केला. शरीफ म्हणाले की, फैज हमीद यांनी बरीच वर्षे राजकीय हस्तक्षेप केला आहे. त्यांनी आपल्या शपथेचे उल्लंघन केले. नवाज शरीफ म्हणाले की, मी थेट नावे घेत आहे कारण मला माझ्या सैन्याचा अपमान करायचा नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा