मुंबई, 13 जानेवारी 2022: कोविड तिसरी लाट: देशात प्रथमच तिसर्या लाटेदरम्यान, 24 तासांत कोरोना विषाणूची 2 लाखांहून अधिक प्रकरणं आढळून आली. गुरुवारी मध्यरात्री 12 पर्यंत एकूण 245,525 कोविड रुग्ण आणि 379 मृत्यूची नोंद झालीय. या दरम्यान 84,479 लोक बरेही झाले आहेत. यासोबतच सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 667 ने वाढली आहे. आता एकूण 11,098,05 सक्रिय प्रकरणं आहेत.
आतापर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 3 कोटी 63 लाख 15 हजार 947 लोक कोविडच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 3 कोटी 47 लाख 6 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान 4 लाख 85 हजार 036 मृत्यूही झाले आहेत.
महाराष्ट्रात बुधवारी 46,723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान 32 जणांचा मृत्यूही झालाय. 24 तासांत येथे सक्रिय रुग्णांची संख्या 18650 वर पोहोचली आहे. आता राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2,40,122 झाली आहे. तर मंगळवारी राज्यात 34,424 रुग्ण आढळले.
दुसरीकडं, गेल्या 24 तासांत दिल्लीत 27,561 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एका दिवसात 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे. म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या 12 दिवसांत 133 बाधित लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज संसर्ग दर 26.22% नोंदवला गेला. 24 तासांत 14,957 लोकांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत एकूण 15,05,031 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
यापूर्वी, राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी 19166 आणि रविवारी 22 हजार पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. संसर्ग दर अनुक्रमे 25.65, 25 आणि 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 8 महिन्यांत केवळ बुधवारीच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
बुधवारी कर्नाटकात कोरोनाचे 21,390 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, बेंगळुरूमध्ये 15,617 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. सध्या राज्यात सकारात्मकता दर 10.96% आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणं 93,009 आहेत. बंगळुरूमध्ये 73 प्रकरणं सक्रिय आहेत. बुधवारी 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यापैकी 6 बेंगळुरूचे आहेत. गेल्या 24 तासात 1,95,047 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आलीय.
तामिळनाडूमध्ये 24 तासांत 17,934 रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 19 जणांचा मृत्यू झालाय. तसेच बुधवारी 4039 लोक बरे झाले आहेत. बुधवारी 13876 सक्रिय रुग्ण वाढले असून, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 88959 झालीय.
उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,592 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2181 प्रकरणं लखनौमध्ये आढळून आली आहेत. त्याच वेळी, नोएडामध्ये 1992 आणि गाझियाबादमध्ये 1526 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. 24 तासात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यूपीमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 57355 वर गेलीय. त्याचबरोबर 24 तासांत 700 रुग्ण बरे झाले आहेत.
केरळमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये मोठी झेप होती. बुधवारी 12,742 प्रकरणं झाली आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 50,254 लोकांचा कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालाय. तिरुअनंतपुरममध्ये सर्वाधिक 3498, एर्नाकुलममध्ये 2214, कोझिकोडमध्ये 1164, त्रिशूरमध्ये 989, कोट्टायममध्ये 941, पठानमथिट्टामध्ये 601, कोल्लममध्ये 559, कन्नूरमध्ये 540, मलाकपूरमध्ये 495, पल्पपूरममध्ये 495 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. इडुक्कीमध्ये 367, कासारगोडमध्ये 200 आणि वायनाडमध्ये 200 सापडले आहेत. गेल्या 24 तासांत 72,808 नमुने तपासण्यात आले.
पंजाब या निवडणूक राज्यात कोरोनाचे 6,344 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे 10 जणांचा कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालाय. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 26,781 वर पोहोचली आहे.
बुधवारी छत्तीसगडमध्ये कोरोनाचे 5476 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे 1933 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. बुधवारी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 27425 सक्रिय रुग्ण आहेत.
या राज्यांनी चिंता व्यक्त केली
भारतातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, देशातील सर्वाधिक सकारात्मकता दर महाराष्ट्रात 22.39% नोंदवला गेलाय. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये हा दर 32.18%, दिल्लीत 23.1% आणि यूपीमध्ये 4.47% आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे