२०३२ मध्ये पृथ्वी आणि चंद्रावर ‘हा’ लघुग्रह धडकणार..!

20

बेंगळुरू, १९ फेब्रुवारी २०२५ : २०३२ मध्ये पृथ्वीवर मोठं संकट येण्याची शक्यता नासाच्या अंतराळ शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. ‘Asteroid 2024 YR4’ हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असून या लघुग्रहाचा धोका फक्त पृथ्वीलाच नाही तर चंद्राला देखील आहे. ‘Asteroid 2024 YR4’च्या धडकेची शक्यता वाढली असून हा लघुग्रह धडकलयास चंद्र आणि पृथ्वीवर मोठं नुकसान होऊ शकतं, असा अंदाज वर्तवला जातोय.

नव्या अभ्यासाच्या आधारे हा लघुग्रह चंद्रालाही धडकू शकतो, असे सांगण्यात आले आहे. असे झाल्यास चंद्र आणि पृथ्वीवर मोठे नुकसान होऊ शकते. सध्याच्या अंदाजानुसार एखादा लघुग्रह चंद्रावर आदळला तर ३४० हिरोशिमा बॉम्बची ऊर्जा आकाशाच्या दिशेने वाढेल. तसेच हा स्फोट इतका मोठा असेल की तो पृथ्वीवरून देखील पाहता येईल. या धडकेमुळे चंद्रावर २ किलोमीटर मोठा खड्डा तयार होऊ शकतो.

हे चक्रीवादळ पृथ्वीवर आदळल्यास पूर्व पॅसिफिक महासागर, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आफ्रिका, अरबी समुद्र आणि दक्षिण आशियात त्याचा परिणाम दिसू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पूनम सुपेकर-जठार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा