गोल पोस्ट आरोग्य “हा” गोलंदाज निघाला कोरोना पॉझिटिव्ह

“हा” गोलंदाज निघाला कोरोना पॉझिटिव्ह

बांगलादेश, ११ ऑगस्ट २०२०: कोरोनाने जगभरात थैमान घातले असून त्याच्या तावडीतून लस आल्या शिवाय काही सुटका होणार नाही असे स्पष्ट संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. तर बहुतांशा तंदरुस्त असलेल्या खेळाडूनां आणि त्यांच्या कुंटूबाला देखील कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे.

बांगलादेश संघाचा फिरकी पट्टू गोलंदाज मोशर्रफ हुसनेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्याला एकट्याला नाही तर त्याच्या वडिलांना हि कोरोना झाला आहे. अशी माहिती मोशर्रफने दिली आहे. तसेच मी हळूहळू तंदुरुस्त होत असून स्वत:ला आयसोलेटड केल्याचे त्याने सांगितले. तर गतवर्षीच मोशर्रफला ब्रेन टयुमर झाल्याची बातमी देखील आली होती.

मोशर्रफ हुसनेचा रिपोर्ट पाॅजिटिव्ह येताच क्रिकेट विश्वातील त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर मागील काही आठवड्यात सौरव गांगुलीच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version