मुंबई, २३ ऑक्टोबर २०२०: शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे की, त्यांनी इलॉन मस्क यांना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण दिले आहे. इलॉन मस्क हे प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे संस्थापक आहेत. तसेच त्यांचे लोकांना मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याचे सुद्धा स्वप्नं आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी या बाबतची माहिती ट्विटर द्वारे दिली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले की, टेस्लाला महाराष्ट्रात बोलवण्यासाठी इंडस्ट्रीज मिनिस्टर सुभाष देसाई यांचे मस्कसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये जोर देत महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाब लक्षात घेऊन सतत विकासासाठी काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर रिप्लाय देत इलॉन मस्क म्हणाले ‘ पुढच्या वर्षी नक्की” ट्विट सोबत इलॉन मस्क यांनी एक टी शर्टचा फोटो सुद्धा शेअर केला होता ज्यात ‘इंडिया वॉन्टस टेस्ला’ असे लिहिले होते. तसेच प्रतीक्षा करण्यासाठी धन्यवाद ही म्हंटले आहे. इलॉन मस्क यांचे भारतात व्यापार करण्याचे पाऊल भारतासाठीही उपयोगी ठरू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे