नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२०: टिकटॉक अॅपवर भारतात बंदी घालून कितीतरी दिवस होऊन गेले आहेत. तरुणांना अक्षरशः वेड लावून सोडले होते या टिकटॉक अॅपने. तसेच आता अमेरिकेने ही सुरक्षेच्या बाबतीत भारताच्या पावलावर पाऊल टाकायच ठरवलं आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनी टिकटॉक अॅप खरेदी करू शकते.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे,” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्याशी बोलणं झालं आहे. मायक्रोसॉफ्ट अल्पसंख्य तत्वावर अमेरिकेला यातील काही हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलावू शकतो.
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. अमेरिका हे सुरक्षतेच्या बाबतीत खूपच चिंतेत आहे. यामुळेच अमेरिकेच्या हितासाठी मायक्रोसॉफ्ट हे टिकटॉक अॅप खरेदी करण्याचा विचार करत आहे. टिकटॉक ची बाईट डान्स ही मूळ कंपनी ताब्यात घेण्यासाठी सर्व चर्चा १५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार आहेस असे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे.
आणि जर मायक्रोसॉफ्ट कंपनीने टिकटॉक अॅप घेतले तर, अमेरिका कॅनडा , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या विविध देशांमध्ये वापरले जाणारे टिकटॉक अॅप मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात येणार आहे. तसेच टिकटॉक हे अल्गोरीदम आणणार आहे. हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि सध्या इंस्टाग्राम मध्ये यूज होणारी रिल्सची सुविधा हि आमची आहे आणि फेसबुकने इंस्टाग्रामसाठी टिकटॉकची कॉपी केली आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरॆ.