मनोरंजन क्षेत्रातील ‘या’ कंपनीने दिला ७ हजार कर्मचाऱ्यांना नारळ; ग्राहकांची संख्याही घटली

नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२३ : जागतिक आर्थिक मंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसत आहे.जगभरातील कंपन्यांमध्ये कपातीची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही आहे. फेसबुक, ट्विटरपासून गुगलपर्यंत मंदीचे कारण देत कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. त्यात आता मनोरंजन कंपनी डिस्नेच्या नावाचाही समावेश झाला आहे. या कंपनीने ७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याची घोषणा केली आहे.

कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, जगभरातील आमच्या कर्मचार्‍यांबद्दल आम्हाला खूप आदर आणि कौतुक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. माझ्या समोर नवीन आव्हाने आहेत. मंदीचा मोठा फटका कंपनीला बसत आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णाय घेतला आहे. डिस्नेतील कर्मचारी कपातीसोबतच त्यांनी गेल्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचेही सांगितले. तसेच डिस्नेला नेटफ्लिक्सकडूनही होणाऱ्या चूरशीच्या अटीतटीच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या नोकरकपातीमुळे अंदाजे ५.५ अब्ज डाॅलर्सचा होणारा खर्च वाचणार आहे. आगामी काळात कंपनीची पूर्नरचना करण्याच्या उद्देशाने ही कर्मचारी कपात केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षात कंपनीने आतापर्यंत ३ वेळा पूर्नरचना केली आहे.लाईव्ह स्ट्रिमिंग व्यवसायाला गती देण्यासाठी कंपनीने २०१८ मध्ये पहिल्यांचा पूर्नरचना करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना काळात अंदाजे ३२ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले. आणि आत्ता ७ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.

  • वाचा कोणत्या कंपनीत किती कपात?

ट्विटर : एलन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण ५० टक्के कर्मचारी कपात केली आहे.

नेटफ्लिक्स : नेटफ्लिक्सलाही यंदा आर्थिक फटका बसला असून कंपनीने दोन टप्प्यात कर्मचारी कमी केले आहेत.

मेटा : फेसबुकची मूळ कंपनी मेटा कंपनी देखील हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

ॲमेझॉन : ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन १८ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

सिगेट टेक्नॉलॉजिज : हार्ड ड्राईव्ह निर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीकडून ३ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

इंटेल : १८ हजार कोटींची बचत करण्यासाठी जवळपास २० टक्के कपातीची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्ट : अपेक्षित उत्पन्न नसल्याने मायक्रोसॉफ्टने १० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा