“या” कंपनीने काढली पिरियड्स लिव्हची पाॅलिसी

मुंबई, १० ऑगस्ट २०२० : सध्याच्या घडीला महिला या पुरुषांचा खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. तर समाजामधे देखील त्यांना मान सम्मान देण्यात येतो. महिलांच्या अनेक वयक्तिक आडचणींवर सराकारच काय तर खासगी कंपन्या देखील त्यांना विशेष सवलती देताना आपल्याला दिसतात.अशातच एक नामांकित कंपनीने महिलांसाठी अशीच एक सुविधा दिली आहे.

महिलांना समाजामधे घरचेच नाही तर दुसरे देखील अनेक कामें आसतात.ज्या त्या निर्विवादपणे करत असतात.पण काही वेळा त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वयक्तिक अर्थात मासिक पाळीचा सामना करावा लागतो.आणि या साठीच झोमेटो कंपनीने वर्षाला १० पिरियड्स लिव्ह देणार असल्याची माहीती दिली आहे.या मधे प्रत्येक मासिक पाळीसाठी महिला कर्मचारी आता १ सुट्टी घेऊ शकते.

कंपनीचे अध्यक्ष दिपेंदर गोयल यांनी हि घोषणा केली.आणि त्या बरोबरच मासिक पाळीच्या सुट्टीसाठी तुम्ही मनमोकळेपणाने अर्ज करा त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही असे आवाहन करण्यात आले. तर महिलांबरोबरच तृतीयपंथी कर्मचा-यांना देखील या सुट्ट्या घेता येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा