या दिवशी होणार वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या भारतात किती वाजता दिसणार

29

मुंबई, 5 मे 2022:वर्ष 2022 चं पहिलं चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. यंदाचं हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल. या वर्षी दोन चंद्रग्रहण होणार आहेत. सर्वप्रथम, 16 मे 2022 रोजी चंद्रग्रहण होणार आहे. त्याच वेळी, दुसरं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. हे दोन्ही चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असतील. चला तर मग जाणून घेऊया भारतातील वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची वेळ आणि ते कुठं दिसेल.

वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची वेळ

वर्षातील हे पहिलं चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी 8.59 ते 10.23 पर्यंत वेळ लागेलहे चंद्रग्रहण होईल. मात्र, भारतात या चंद्रग्रहणाची दृश्यमानता शून्य असेल.

कुठं दिसल चंद्रग्रहण

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा बहुतांश भाग, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका येथेही दिसणार आहे.

काय आहे पूर्ण चंद्रग्रहण

यंदाचं चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होतं जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना उजवीकडे सरकते आणि त्याच वेळी चंद्र पृथ्वीच्या समोर येतो. अशा स्थितीत पृथ्वी सूर्याला पूर्णपणे झाकते, त्यामुळं सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे