गोल पोस्ट इतर राजकारण माणसं संपविण्यासाठी हे सरकार सत्तेवर आलंय : संजय राऊत

माणसं संपविण्यासाठी हे सरकार सत्तेवर आलंय : संजय राऊत

रत्नागिरी, १७ फेब्रुवारी २०२३ : विरोध करणाऱ्यांच्या यापूर्वी चौकशा लावल्या जात होत्या. जेलमध्ये टाकले जात होते; मात्र आता विरोधकांचा आवाज कायमचा बंद करण्यासाठी खून केला जाईल, हे या घटनेतून प्रकर्षाने पुढे आले. माणसं संपविण्यासाठी हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मला देखील तुरुंगात मारण्याचा प्रयत्न केला होता. माणसं संपविण्यासाठी हे सरकार आलंय.
अशा प्रकारे महारष्ट्र चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. शेतकरी, मच्छीमार यांच्या मृतदेहावरून प्रकल्प नाही होणार असे ते म्हणाले. शशिकांत वारिसे यांची हत्या ही राजकीय हत्या आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

error: Content is protected !!
Exit mobile version