सौदी अरेबियानं परप्रांतीय कामगारांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सौदी अरेबिया, ६ नोव्हेंबर २०२०: सौदी अरेबियानं परदेशी कामगारांच्या करारावरील निर्बंधाला सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कामगारांना सौदीमध्ये असताना नोकरी बदलण्याचे स्वातंत्र्य असंल. सौदी अरेबियाच्या मानव संसाधन मंत्रालयानं याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी मार्चपासून सौदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

सौदी मानव संसाधन मंत्रालयाचे उपमंत्री अब्दुल्ला बिन नासिर यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितलं की, आता परदेशी कामगार नियोक्ताची परवानगी घेतल्याशिवाय सौदी अरेबिया सोडून जाऊ शकतात. नियोक्ता याचा अर्थ असा की त्यांचे मालक कोण आहेत किंवा ते कुठे काम करतात. नासिर म्हणाले की अशा सुविधा देण्यामागचे कारण हे आहे की या सुविधा पाहून परदेशी कामगार सौदी अरेबियातील बाजाराकडं आकर्षित होतील.

मानव संसाधन मंत्रालयानं म्हटलं आहे की आता परदेशी कामगार नोकर्‍या बदलू शकतात. या महत्त्वपूर्ण बदलानंतर आता कामगार आपल्या इच्छेने ये-जा करू शकतात. तसेच नियोक्ता कोणाचा व्हिसा घेऊ शकत नाही. याआधी नियुक्ता कामगारांचे विसा घेत असत त्यामुळं कामगारांना स्वतःच्या इच्छेनं आपल्या मायदेशी जाता येत नव्हते. सौदी अरेबियामध्ये, याला काफला प्रणाली म्हणतात, ज्या अंतर्गत नियोक्‍यांना परदेशी कामगारांना नोकरी बदलू न देण्याची आणि अगदी देश सोडून त्यांच्या इच्छेवर अवलंबून राहण्याचे अधिकार दिले गेले. काफला प्रणालीतील या सुधारणेचा फायदा सौदी अरेबियाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांपैकी एक कोटी परदेशी कामगारांना होईल.

कतार २०२२ मध्ये फिफा विश्वचषक आयोजित करणार आहे. हे लक्षात घेता कतारनं कामगार कायद्याचेसुद्धा उदारीकरण केलं आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की सौदीच्या नुकत्याच झालेल्या सुधारणेमुळं परदेशी कामगारांना फायदा होईल परंतु ते पूर्णपणे संपविणं आवश्यक आहे.

सौदीच्या काफला प्रणालीनुसार परप्रांतीय कामगारांना आपल्या मालकाचं शोषण टाळण्याचा कोणताही अधिकार नाही कारण त्यांना देश सोडण्याचा आणि नोकरी बदलण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत परदेशी कामगारांशी ही मनमानी असते. ते अधिक तास काम करण्यासाठी तयार केले जातात. मालक पगार देण्यास टाळाटाळ करतात.

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या २०३० च्या दृष्टीकोनातून काफलामधील सुधारणा झाली आहे. परदेशी गुंतवणूकदार आणि खासगी क्षेत्राच्या विस्तारासाठी सौदी अरेबिया महत्त्वपूर्ण स्थान बनू शकेल अशी सलमानची इच्छा आहे. तसेच सौदीच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व देखील कमी केले पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा