मुंबई, १५ जून २०२१: एक बातमी येते आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सला सोमवारी लोअर सर्किट लागण्यास सुरुवात होते. यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) तीन परदेशी फंड खाती सील केली असून, अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये त्यांचे ४३,५०० कोटी रुपयांचे शेअर्स आहेत.
या अहवालानंतर अदानी समूहाचे मार्केट कॅप १० टक्क्यांहून अधिक म्हणजे १.०३ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मार्केट कॅप घसरून ८.९ लाख कोटी रुपयांवर गेले. तर यापूर्वी शुक्रवारी कंपन्यांचे मार्केट कॅप ९.५ लाख कोटी रुपये होते.
वस्तुतः सोमवारी बाजार सुरू होताच अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण मोठ्या प्रमाणावर दिसून आली. गौतम अदानीच्या सर्व कंपन्यांमधील लोअर सर्किटमुळे, समूहाची मार्केट कॅप सुरुवातीच्या व्यापारात एका झटक्यात ८.५ लाख कोटी रुपयांवर गेली. मात्र त्यानंतर हळूहळू शेअर्समधील घट कमी झाली आणि बाजार बंद होताच अदानी ग्रुपच्या कंपन्यांची मार्केट कॅप पुन्हा किंचित वाढून ८.९ लाख कोटी रुपयांवर गेली.
गुंतवणूकदार अदानी समूहाच्या विधानाची वाट पाहत होते आणि नंतर दुपारी अदानी समूहाने दोन्ही एक्सचेंजला सांगितले की खाते सील करण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. या समूहाने असे म्हटले आहे की, कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी कोणी तरी ही बातमी मुद्दाम लावली आहे. या समूहाने म्हटले आहे की १४ जूनपर्यंत कोणत्याही परदेशी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते सील केलेले नाही.
इतकेच नव्हे तर अदानी समूहाने असे म्हटले आहे की, ज्या तीन विदेशी गुंतवणूकदारांवर कारवाईची चर्चा आहे त्यांच्यापैकी कोणाविरुद्धही अशी कारवाई केली गेली नाही. या वृत्तामुळे गुंतवणूकदारांच्या नुकसानाबरोबरच या ग्रुपच्या प्रतिष्ठेलाही इजा झाली आहे. अल्पसंख्यक भागधारकांच्या हितासाठी आम्ही अशी माहिती जाहीर करतो की अशा प्रकारची कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे, अहवालानुसार अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंडवर कारवाई करण्यात आली आहे. एनएसडीएलच्या मते अदानीच्या कंपन्यांमध्ये या तिघांची एकूण गुंतवणूक ४३,५०० कोटी रुपये आहे. ही खाती सील गेली कारण सेबीकडे त्यांच्याविषयी माहिती नाही. तसेच या पैशांचे मालक कोण आहेत, हेदेखील माहित नाही, म्हणून त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
एकूण गुंतवणूक ४३,५०० कोटी रुपये
या गुंतवणूकदारांची अदानी एंटरप्रायजेसमध्ये ६.८२% भागभांडवल आहे, त्याची किंमत १२,००८ कोटी रुपये आहे. अदानी ट्रान्समिशनची ८.०३% गुंतवणूक आहे आणि त्याची किंमत १४,११२ कोटी रुपये आहे. अदानी टोटल गॅसची ५.९२% गुंतवणूक आहे, त्याचे मूल्य १०,५७८ कोटी रुपये आहे. अदानी ग्रीन एनर्जीची गुंतवणूक ३.५८% आहे, तर त्याचे मूल्य ६,८६१ कोटी रुपये आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे