शिवसेनेत हे पहिल्यांदाच घडतंय: शंभूराजे देसाई

मुंबई, २३ सप्टेंबर २०२२: शंभूराजे देसाई गुरुवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. पत्रकार परिषद घेत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घ्यावा लागतोय. याआधी संपर्कप्रमुख आणि उपनेते, आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या बैठका घेत होते. त्यामुळे, आम्ही घेतलेल्या भूमिकेने गटप्रमुखांचा थेट उद्धव ठाकरे यांना भेटता येते असे म्हणून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर आले आहेत. सध्या हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मेळावा घेऊन पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘बाप पळवणारे टोळी’ म्हणून शिंदे गटाला हिणवले. त्यानंतर, आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आले आहे. उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराजे देसाई यांनी तर थेट उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पक्षप्रमुखाला गटप्रमुखांची बैठक घ्यावी लागते. शिवसेनेच्या इतिहासात आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते असे ते म्हणाले.

जनतेच्या आणि शिवसेनेतील अनेकांच्या मनात नसतानाही महाविकास आघाडीची स्थापना झाली. स्वतःच्या स्वार्थांसाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी हे कधीच मान्य केले नसते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष शिवसेना कोणाच्या दावणीला बांधली, असे सवालही उपस्थित केला. शिवसेनिकांना बोलायचे एक आणि करायचे दुसरेच; यामुळे आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असूनही आमदारांची कोंडी होत होती. ठरल्याप्रमाणे अनेक गोष्टी झाल्या नाहीत त्यामुळे अंतर वाढत गेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा