राम मंदिराच्या भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही – राज ठाकरे 

मुंबई, दि. ३१ जुलै २०२०: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली मतं मांडली आहेत.

देशभर कोरोनाचं संकट असताना अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन येत्या ५ ऑगस्ट रोजी होत आहे. या मंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.परंतू कोरोनाच्या संकटामुळे खूप कमी आणि मर्यादित लोकांनाच या भूमीपूजनाला उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे अनेक रामभक्तांना या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही. मात्र हा भूमीपूजन सोहळा इतक्या लवकर का करण्यात येतोय? हे मला कळलं नाही. असं वक्त्यव्य राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत केलं आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. लोकांना रोजगार नाही. लोक मानसिकदृष्ट्या खचली आहे. अगोदर त्यांना या विवंचनेतून बाहेर काढलं पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले.

त्याचप्रमाणे राम मंदिर हे माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी सन्मानाची गोष्ट आहे. राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा हा धुमधडाक्यात झाला पाहिजे. मात्र सध्याची स्थिती योग्य नाही त्यामुळे दोन महिन्यांनंतर भूमीपूजन केलं असतं तरी चाललं असत. लोकांनाही याचा आनंद घेता आला असता असंही राज ठाकरे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा