कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक वर्षभरात तिसऱ्यांदा तहकूब, यावेळी कोरोना हे कारण

नवी दिल्ली, ११ मे २०२१: कॉंग्रेसमधील अंतर्गत निवडणुका पुन्हा तहकूब करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी २३ जून रोजी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला, त्यास उर्वरित सदस्यांनी विरोध दर्शविला. आता कोरोना संकटानंतर निवडणुका होणार आहेत. काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे की कोरोना स्थिती सामान्य झाल्यानंतरच अंतर्गत निवडणुका घेण्यात याव्या.

कॉंग्रेस कार्यकारी समितीने एकत्रितपणे निर्णय घेतला आहे की सध्याच्या परिस्थितीत निवडणुका घेणे योग्य होणार नाही. जून मध्ये निवडणुक न घेता पुढे ढकलली जावी असे कॉंग्रेस कार्यकारिणीने ठरविले. परिस्थिती पाहता पुन्हा तारीख निश्चित केली जाईल. गेल्या वर्षी ऑगस्टपासून अध्यक्षपदासाठी ३ वेळा निवडणुका तहकूब करण्यात आल्या आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपद सोडले. यानंतर त्यांना पुन्हा पदभार संभाळण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले, परंतु ते पुन्हा कॉंग्रेस अध्यक्ष होण्यास तयार नव्हते. यानंतर सोनिया गांधी यांना कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्ष केले गेले. कॉंग्रेसची कमान अजूनही सोनियांच्या ताब्यात आहे.

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे की, राहुल गांधी हे पद स्वीकारण्यास तयार आहेत की नाही? यापूर्वी, बंडखोर नेत्यांनी अंतर्गत निवडणुका घेण्याची मागणी केली होती तेव्हा कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा