यामुळे ‘आप ‘ ला जनतेने नाकरल; दिल्ली विधानसभा निकालावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया म्हणाले..

12

८ फेब्रुवारी २०२५ दिल्ली : दिल्ली विधानसभेचा निकाल आज सकळपासून सुरू झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आमआदमी पार्टी यांच्यात जोरदार संघर्ष होताना दिसला. जवळपास १२ वर्षांपासून आमआदमी पार्टीने दिल्लीमध्ये आपली सत्ता कायम ठेवली होती. यंदाही आमआदमी पार्टी आपली सत्ता कायम ठेवेल असे वाटले होते. मात्र निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या काळापासूनच भारतीय जनता पार्टीने विजयाचा जोर कायम धरला आणि तब्बल २७ वर्षानंतर दिल्ली आपल्या पदरात घेतली. या निवडणुकीत आमआदमी पार्टीचा जवळपास १३ हजार मतांनी पराभव झाला. याच दरम्यान दिल्ली विधानसभेच्या निकालावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरुवातीला निवडणूक लढवताना उमेदवारामध्ये कोणते चांगले गुण असायला हवे याबद्दल त्यांनी भाष्य केले. अण्णा हजारे म्हणाले की, “मी आधीच सांगितले आहे की, निवडणूक लढवताना उमेदवारामध्ये आचरण, चांगले आणि शुद्ध विचार, जीवनात त्याग असणे इत्यादी गुण असतील तर जनतेला विश्वास असतो की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करणारा आहे.” मी त्यांना हेच वेळोवेळी सांगत आलो पण त्यांच्या डोक्यात ते आलं नाही.

दारूचे विचार डोक्यात शिरले आणि होत्याच नव्हत झालं :

पुढे आपच्या पराभवाच्या कारणाबद्दल माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, आता हे आप खाली पडले त्यामागचे कारण म्हणजे दारूचे दुकान काढायचे, दारूचे परमीट द्यायचे “हे विचार जेव्हा त्यांच्या डोक्यात शिरले त्यावेळीच आप खाली पडले. लोकशाहीत जागरूक मतदार आहेत. त्यामुळे आजचा मतदार जागरूक झाला असून त्यान पहिलं की हे सगळा दारूचा विचार करतात, त्यामुळे त्यांनी यांना नकार दिला.”

https://twitter.com/PTI_News/status/1888101723937574920

जेव्हा हे माझ्यासोबत आले त्यावेळी मी त्यांना सुरुवातीपासून सांगत आलो की जनतेचा विचार करा. त्यांच्या डोक्यात दारूचे विचार शिरले आणि मोठा घोटाळा झाला. एकदा का दारू डोळ्यासमोर आली की धन, दौलत आल. मग सगळंच बिघडून गेल. त्यामुळे जनतेने योग्य निर्णय घेतला.असे हजारे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा