शाहिद आफ्रिदीचा जावई होणार हा पाकिस्तानी खेळाडू,जाणून घ्या त्याच्या बद्दल……

इस्लामाबाद, ९ मार्च २०२१: पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह हा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. शाहिनचे शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्क्षासोबत लग्न होणार आहे. शाहिद आफ्रिदी यांनी याची माहिती दिली आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाले की,शाहीनच्या कुटूंबाने औपचारिकपणे आपल्या मुलीकडे लग्नासाठी संपर्क साधला. यावर दोन्ही कुटुंबे सहमत आहेत आणि माझी मुलगी शाहीनशी लग्न करणार आहे.

शाहिद आफ्रिदी म्हणाले की, लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल. शाहीनचे वडील अयाज खान यांनीही याची माहिती दिली आहे. त्याने शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलासाठी प्रस्ताव पाठविला होता आणि तोही स्वीकारण्यात आला आहे. अय्याज खान म्हणाले की, आम्ही खूप आनंदी आहोत आणि दोन कुटुंबे गेल्या काही महिन्यांपासून यावर चर्चा करीत होते. आशा आहे की लवकरच तारखेचा निर्णयदेखील होईल.

अक्क्षाचा जन्म १५ डिसेंबर २००१ रोजी झाला होता. ती तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या मुलींना प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. पण पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यांमध्ये त्यांच्या मुलींची छायाचित्रे बर्‍याच वेळा कॅमेर्‍यावर कैद झाली आहेत. शाहिद आफ्रिदीला पाच मुली आहेत. त्यांच्या पाचव्या मुलीचा जन्म गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाला होता. शाहिद आफ्रिदीनेही आपल्या धाकटी मुलीबरोबरचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करत आसतो.

शाहीन आफ्रिदीबद्दल सांगायचेच झाले तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा तो मुख्य गोलंदाज आहे. २००० मध्ये जन्मलेला शाहीन पाकिस्तानसाठी तिन्ही स्वरूपात खेळत आहे. शाहिन आफ्रिदीने पाकिस्तानकडून आतापर्यंत १५ कसोटी,२२ एकदिवसीय आणि २१ टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शाहीन आफ्रिदीने कसोटी, एकदिवसीय सामन्या आणि टी -२० मध्ये अनेक बळी घेतले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा