पुणे शहरातील “हा” भाग ३ मेपर्यंत राहणार पूर्णपणे बंद

पुणे, दि.३०एप्रिल २०२० : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्याहद्दीत ३ मेच्या मध्यरात्री १२ पर्यंत पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

या काळात या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत दूध विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर या प्रतिबंधित क्षेत्रामधील किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटण, अंडी आदी विक्री केंद्र, दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. याबाबत पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हे मनाईचे आदेश काढले आहेत.

त्यांनी काढलेल्या आदेशानुसार, परिमंडळ एक, दोन, तीन आणि चारच्या हद्दीतील भागात औषधे आणि दूध वगळता सर्व प्रकारच्या साहित्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये दुधाच्या वाहतुकीवर बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे सकाळी ६ ते १० या वेळेत घरपोच दूध विक्री सेवा सुरु रहाणार आहे. तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून धान्य वितरित करण्यास मनाई करण्यात आलेली नाही. या प्रतिबंधित क्षेत्रामधील किराणा माल, भाजीपाला व फळे, चिकन, मटण,अंडी आदी विक्री केंद्र, दुकाने तसेच इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

प्रतिबंधित केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे

परिमंडळ १ : समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.

परिमंडळ २ : स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी, लष्कर पोलिस ठाणे- नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रस्ता, मोदीखाना कुरेशी मशिदीजवळचा परिसर, भीमपुरा गल्ली, बाबाजान दर्गा, क्वार्टरगेट रस्ता, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक रस्ता, शितळादेवी मंदिर रस्ता, बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता, सहकारनगर पोलिस ठाणे- तळजाई वसाहत, बालाजीनगर.

परिमंडळ ३ : दत्तवाडी पोलिस ठाणे- पर्वती दर्शन परिसर.

परिमंडळ ४ : येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्राचौक परिसर, खडकी पोलिस ठाणे- पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट.

न्यूज अनकट प्रतिनिधी :

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा