गोल पोस्ट आरोग्य शिवसेनेच्या या आमदाराला कोरोनाची लागण.

शिवसेनेच्या या आमदाराला कोरोनाची लागण.

नाशिक, दि. २० जुलै २०२०: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण आहे. तर त्यांच्या पाठोपाठ नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधानपरिषद सदस्य शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनाही आता कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

नाशिकमधील येवला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसागणिक येथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा वाढतच चालला आहे. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे हे याच येवला शहरात राहतात.

 

याआधी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आता हे नेते कोरोनामुक्त झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version