मुंबई, ११ ऑक्टोबर २०२२ : शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असे युद्ध सुरु आहे. पण चिन्हाचा घोळ शिंदे गटाचा अजूनही सुटताना दिसत नाही. यापूर्वी शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हाचे पर्याय दिले होते. पण त्रिशूळ आणि गदा हे धार्मिक चिन्ह असल्याने त्याला निवडणूक आयोगाने आधीच नकार दिला होता. त्यामुळे या चिन्हावर संपूर्णपणे नकार पडला आहे.
त्यानंतर शिंदे गटाने रिक्षा तुतारी आणि शंख या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवला. पण या पर्यायांनादेखील पसंती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा नवीन चिन्हे आयोगासमोर ठेवली.
त्यानंतर शिंदे गटाने पिंपळाचे झाड, तळपता सूर्य आणि ढाल तलवार या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवला. पण तो ही नाकारत आता शिंदे गट “तळपता सूर्य” या चिन्हावर आग्रही आहे. आता त्यामुळे शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळणार, हे पहावं लागेल.
पण एकीकडे शिंदे गटाकडे जास्त मनुष्यबळ असताना, त्यांच्याकडून अशा प्रकारचा चिन्हाचा गोंधळ होणे अजिबात –हास्त नाही. त्यामुळे या चिन्हाच्या गोंधळामुळे आता जनता जर गोंधळली तर मात्र हे शिंदे गटाला नक्कीच भारी पडेल. त्यामुळे आता शिंदे गटाने जास्त जोरात कामाला सुरुवात करण्याची गरज आहे.
हे असताना तिकडे ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाल्याने त्यांचे एक पाऊल पुढे पडले आहे, असं म्हणावे लागेल. पण त्यामुळे आता शिंदे गट कधी चिन्ह आणि नाव घेऊन कामाला लागेल आणि प्रचारासाठी काय पद्धत अवलंबेल, हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस