मुंबई , ०१, ऑक्टोबर २०२२ : भूल भुलैया २ च्या प्रचंड यशानंतर कार्तिक आर्यन सध्या बॉलीवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेला अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. कार्तिक आगामी काळात अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टसमध्ये झळकणार आहे. त्यातीलच एक म्हणजे ‘आशिकी ३’ या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा काही दिवसापूर्वीच झाली होती. तेव्हापासून या चित्रपटातील तिच्या अभिनेत्रीबाबतच्या चर्चाना उधान आले होते.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अशी चर्चा होती की. कतरीना कैफ, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, किंवा क्रिती सेनन यापैकी एक चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकू शकते. पण आता या चित्रपटात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार, रश्मिका मंदांना ‘आशिकी ३’ चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. रश्मिका आणि कार्तिक आर्यन मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना आपल्याना दिसणार आहेत. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी रश्मिकाच नाव फायनल झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान १९९० मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिकी’ हा चित्रपट महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील गाणी अजरामर ठरली होती.आजही अनेकांच्या तोंडी चित्रपटातील गाणी ऐकायला मिळतात. त्यानंतर २०१३ मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी’ २ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता लवकरच आशिकी ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव