श्रीलंकेत महिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग, आर्थिक अडचणींमुळे उचलले हे पाऊल

कोलंबो, ३१ जुलै २०२२: श्रीलंकेत राष्ट्रपती बदलले आहेत पण श्रीलंकेतील आर्थिक अडचणी अजूनही वाढत आहेत. आता तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लोक खाण्यापिण्यालाही तरसत आहेत. लोकांना दोन वेळच्या भाकरीसाठी इतरांसमोर हात जोडावे लागत आहेत. त्याच बरोबर काही लोक चुकीची कामे करताना दिसतायत. अशीच परिस्थिती तेथील महिलांची आहे ज्यांना वस्त्रोद्योग क्षेत्रातील नोकरी गमावल्यानंतर आता वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे.

वेश्याव्यवसायात ३० टक्के वाढ

या भीषण परिस्थितीत देशभरात तात्पुरती वेश्यागृहे उघडताना दिसत आहेत. येथील महिलांना उदरनिर्वाहासाठी हे काम करावे लागत असल्याने गेल्या काही महिन्यांत वेश्याव्यवसायात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापैकी काही आस्थापना स्पा आणि वेलनेस सेंटर म्हणून काम करतात. या महिलांच्या कुटुंबीयांना दिवसातून तीन वेळचे जेवण देण्याचा हा एकमेव मार्ग शिल्लक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

अन्नधान्याच्या किमती वाढण्याचे कारण

स्टँड-अप मूव्हमेंट लंका (SUML) च्या कार्यकारी संचालक अशिला दंडनिया यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिला आर्थिक संकटामुळे कामावरून काढून टाकल्यानंतर ‘वेश्याव्यवसायाचा’ अवलंब करत आहेत. आशिला म्हणाल्या की, सध्याच्या संकटामुळे अनेक महिला वेश्याव्यवसायाचा मार्ग पत्करत असल्याचे आपण पाहिले आहे कारण खाद्यपदार्थांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की त्यांना घर चालवता येत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा