राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला हा शेअर गुंतवणुकदारांना करू शकतो मालामाल

पुणे, १८ जून २०२१: राकेश झुंझुनवाला यांची होल्डिंग असलेला आणखीन एक शेअर आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. टाटा समूहामध्ये टायटननंतर टाटा मोटर्समध्ये राकेश झुनझुनवाला यांची सर्वात मोठी मालकी आहे. टाटा मोटर्समध्ये सध्या झुंझुनवाला यांची हिस्सेदारी १.३ टक्के आहे आणि आजच्या मूल्यांकनानुसार या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे १५०० कोटी रुपये आहेत.

का वाढणार टाटा मोटर्सचा शेअर?

देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेतील रिकव्हरी आणि टाटा कंपनीचं लक्झरी युनिट जॅग्वार लँड रोव्हर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याच्या रणनीतीमुळं टाटा मोटर्सला चांगली गती मिळू शकेल. जॅग्वार लँड रोव्हर्स २०२५ पर्यंत स्वत: ला संपूर्ण इलेक्ट्रिक ब्रँड म्हणून स्थापित करण्याचे उद्दीष्ट ठेवते. मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिले आहे. सध्या टाटा मोटर्सचे शेअर्स ३५० रुपयांवर ट्रेडिंग करत आहेत पण मोतीलाल ओसवाल यांनी टारगेट प्राईज ४५० रुपये ठेवली आहे. म्हणजेच हा शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

चांगल्या रेवेन्यू फ्लो मुळं कंपनीचं घटणार कर्ज

टाटा मोटर्सचं लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर आहे. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की कंपनीच्या देशांतर्गत आणि परदेशी व्यवसायात साइक्लिक रिकवरीमुळे कंपनीचे कर्ज कमी होईल. यामुळं कंपनीची कॅश पोझिशन बळकट होईल. मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळं प्रवासी वाहनांच्या व्यवसायात घट झालीय, परंतु कमर्शियल बिजनेस मध्ये अजूनही तेजी कायम आहे. पर्सनल वेहिकल सेगमेंट मध्ये कंपनीनं पुनरागमन केलंय. यामुळं कंपनीच्या भाग भांडवलामध्ये जलद गतीनं वाढ झालीय.

जॅग्वार ला इलेक्ट्रॉनिक ब्रँड बनवण्याची तयारी

कंपनीला तिच्या लक्झरी कार ब्रँडला पूर्णपणे इलेक्ट्रिक ब्रँडमध्ये रूपांतरित करायचं आहे. कंपनी येत्या पाच वर्षांत सहा नवीन इलेक्ट्रिक लँड रोव्हर मॉडेल्स बाजारात आणणार आहे. जॅग्वार ने म्हटलं आहे की ते २०२५-२६ पर्यंत ३० अब्ज पौंड उत्पन्न कमावेल. बिग बुल मानल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी केले. यानंतर त्यांचे शेअर्स २५६ टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीत झुंझुनवाला यांचा १.३ टक्के हिस्सा आहे. सध्याच्या बाजारभावावर झुंझुनवाला यांच्या शेअरची किंमत १५०० कोटी रुपये आहे. कोविडच्या पहिल्या लाटे नंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मागील वर्षी मोठी घसरण झाली होती. तेव्हा तो प्रति शेअर ६५ रुपयांवर आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा