मुंबई, १८ फेब्रुवरी २०२१: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली. मंडळाने १८ सदस्यांची टीम जाहीर केली आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफीसाठी संघातून सोडण्यात आले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादव असेल. मात्र, उमेश यादवची तंदुरुस्ती पाहूनच त्याला अहमदाबादमध्ये संघात सामील केले जाईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. तिसरी कसोटी २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान होईल. हा कसोटी सामना मोटेरा येथे डे-नाईट असेल. त्याचबरोबर चौथा आणि शेवटचा सामना ४ ते ८ मार्च दरम्यान खेळला जाईल.
चार कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे खेळले गेले. मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला २२७ धावांनी पराभूत केले. यानंतर दुसर्या कसोटीत भारतीय संघाने पुनरागमन केले आणि इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव केला.
संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमन साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मो. सिराज
नेट बॉलर – अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णाप्पा गौतम, सौरभ कुमार
स्टँडबाय प्लेयर्स – के एस भारत, राहुल चहर
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे