यंदा आंब्याच ५० लाख टन कमी उत्पादन, गारपिटीमुळे देशभरात आंब्यांची नासाडी

नवी दिल्ली १ मे २०२३ : गारपिट,अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि उष्णतेमुळे देशभरात आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आवक, उत्पादन कमी होत असल्याने यंदा आंब्यांची चव घेणे थोडे महाग ठरत आहे.

नुकसानाची दाहकता बघितली तर देशातील दोन मोठी राज्ये, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये आंब्यांचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.

दोन्ही राज्यांतील आंबा उत्पादक आणि वितरकांनी दावा केलाय की, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे आंब्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.आंध्र प्रदेशच्या आंब्यांची बाजारातील आवक पाहता तज्ज्ञांकडून नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) म्हणणे आहे की, सरासरी तोटा २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत आंब्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता नाही.

देशातील आंब्यांच्या एकूण उत्पादनापैकी २३% उत्पादन उत्तर प्रदेशात होते. १६ % म्हणजे सरासरी १५.५० लाख मेट्रिक टन आंबे बिहारातून मिळतात. या वेळी बिहारमध्ये आंब्यांचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त असू शकते. महाराष्ट्रात उष्णतेमुळे २०२२ च्या तुलनेत या वेळी उत्पादन ५० % कमी राहिले.

देशातील आंबा नुकसानीचा अहवाल सर्व राज्यांकडून मागवला आहे, त्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन करता येईल असे भारतीय कृषी संशोधन परिषदेने सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा