गोल पोस्ट महाराष्ट्र ‘सेल्फी विथ खड्डा’ यावर्षी हा उपक्रम मुंबई-गोवा महामार्गावर…

‘सेल्फी विथ खड्डा’ यावर्षी हा उपक्रम मुंबई-गोवा महामार्गावर…

मुंबई, ३० ऑगस्ट २०२० :मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्डयावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणी माणूस कोकणात गेला खरा मात्र परत येतांना, त्यांना कंबरेचे आजार झाल्याशिवाय राहणार नाही. कोकणातील रस्त्यांकडे ह्या सरकारनं दुर्लक्ष केलंय. कोकणातील माणसाला मानसिक, शारिरीक झालेल्या त्रासाबद्दल आम्ही सरकारचा निषेध करतो. असं पत्र आशिष शेलार यांनी अशोक चव्हाणांना पाठवलं आहे.

भाजपचे आमदार तसेच माजी मंत्री आशिष शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांवरून पत्र लिहलं आहे. शेलार यांनी पत्रातून राज्यातील महाविकास आघडीवर सरकारवर टिका केली आहे. “गेल्यावर्षी ‘सेल्फी विथ खड्डा’ काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा उपक्रम राबवणार का? असा प्रश्न त्यांनी या पत्राद्वारे विचारला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version