मुंबई, ४ ऑगस्ट २०२१: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल ९९.६३ टक्के लागलाय. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला.
यंदा राज्यात १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के तर ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तसेच ९१,४३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. तसेच १३७२ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. ६६,८७१ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६६,८६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.३१ टक्के लागलाय. यंदाच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे यंदा एकाही महाविद्यालायाचा ० टक्के निकाल लागला नाही.
राज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार आहे. विभागीय मंडळ स्थरावरून संबंधित तक्रारींचे निराकर केले जाणार आहे,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.
विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के
कला विभाग – ९९.८३ टक्के
कॉमर्स वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१
मुलींची बाजी ९९.७३ टक्के
मुलांना ९९.५४ टक्के
कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त ९९.८१
मुंबई विभाग ९९.७९
पुणे विभाग – ९९.७५
नाशिक ९९.६१ टक्के
कोल्हापूर ९९.७६
अमरावती ९९.७३
लातूर ९९.६५
औरंगाबाद ९९.३४ औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे