यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार इराणमध्ये कैदेत असलेल्या महिला पत्रकार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर

नवी दिल्ली, ६ ऑक्टोंबर २०२३ : इराणी महिला पत्रकार आणि कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल २०२३ चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नोबेल समितीने महिला स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कांसाठी नर्गिस मोहम्मदी यांनी आवाज उठवल्याचे मान्य केले आहे. ५१ वर्षीय नर्गिस अजूनही इराणमध्ये कैद आहेत. नर्गिस मोहम्मदी यांना आतापर्यंत १३ वेळा अटक करण्यात आली असुन त्यांना ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटके मारण्यात आले आहेत. सरकारविरोधात अपप्रचार केल्याच्या आरोपावरून इराणने त्याला अटक केली आहे. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर नर्गिस यांना ८.३३ कोटी रुपयांचे बक्षीस आणि सुवर्णपदक देण्यात येणार आहे.

नोबेल शांतता पुरस्कार १९०१ मध्ये सुरू झाला आहे आतापर्यंत १११ लोकांना आणि ३० संस्थांना हा सन्मान मिळाला आहे. नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात.

कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दिला जाणारा हा शांतता पुरस्कार, यंदा महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे ह्युमन ऍक्टिव्हीस्ट ऍलेस बिलियात्स्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा