गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला यंदाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला यंदाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

नाशिक, २४ ऑक्टोबर २०२० : उत्कृष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार यंदा नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला जाहीर करण्यात आला आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या लोकहितवादी मंडळानं कला क्षेत्रात केलेल्या मोठ्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे.

दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून यशंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी २५ नोव्हेंबरला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version