थोडीशी तंबाखू…देतो कारे भाऊ..!

पुणे, दि.३मे २०२० :लॉकडाऊन लागल्यापासून व्यसनी माणसांना आपली असलेली तल्लफ भागवणे अवघड बनले आहे. त्यात राजकारणी ते खेड्यातील सर्वसामान्य माणुस आपली तल्लफ भागवताना वेगवेगळ्या शक्कल लढवताना पहायला मिळतात. त्यात आपल्या राज्यात तंबाखू शौकीन काही कमी नाहीत. कशाप्रकारे ते आपली गरज भागवतात हा एक संशोधनाचाच विषय आहे. तंबाखूची तलफ असणारी मंडळी पुडीचा जपून जपून वापर करत अधिकाअधिक विडे करण्यावर भर देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.त्यामुळे “थोडीशी तंबाखू देतो कारे भाऊ…!म्हणण्याची वेळ तल्लफ शौकिनांनवर आली आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व बंद आहे. त्यामुळे तंबाखू सह अन्य व्यसन असणाऱ्या व्यक्तीचेही हाल होताना दिसत आहेत. खेडयापाड्यातील किराणा मालाच्या दुकानात १० रुपयाला मिळणाऱ्या तंबाखूच्या पुडीचे दर या टाळेबंदीच्या काळात मर्जीप्रमाणे वाढत चालल्याचे पहायला मिळते आहे. सुरुवातीला २१ दिवसाच्या पहिल्या टप्प्यात तंबाखूच्या पुडीचा दर २० रुपयापर्यंत पोहचला होता. त्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र तंबाखूच्या पुडीचा भाव ४० रुपयापर्यंत पोहचला आहे. तरी देखील हे तंबाखू शौकीन आपली तल्लफ भागवतात. चौपट दराने पुडी खरेदी करून आपली गरज भागवताना पहायला मिळतात.

लॉकडाऊन जर अधिक काळ असाच राहिला तर या गरजेसाठी व्यसनी माणसं अधिक पैसे देण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. याशिवाय कुटुंबातील तंबाखू खाणाऱ्या व्यक्ती देखील आपल्याकडील तंबाखू संपल्याचे कारण देत तंबाखू देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे घरातच तंबाखू लपवळपविचा खेळ सुरू झाला आहे.

त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात व्यसनी लोकांचे फार हाल होताना दिसत आहेत. त्यांची गरजेची वस्तू त्यांना नाही वेळेत मिळाली की ,नुसते सैरभैर झाल्यासारखं होत. त्यामुळे अनेकजण हा लॉक डाऊन कधी संपणार याची वाट पाहतांना दिसत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा