“त्या” लोकोपायलटमुळे वाचले रेल्वे रुळावरून चालणाऱ्या नागरिकांचे प्राण

पुणे, दि.१०मे २०२० : रेल्वे ट्रॅकवर चालणे जीव घेणे ठरू शकते, लोक आजही आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावरून आपला जीव धोक्यात घालत आहेत. नुकतीच औरंगाबाद येथे घडलेली घटना याचे ताजे उदाहरण आहे. मात्र उरुळकांचन ते लोणी स्टेशनजवळ या घटनेची पुनरावृत्ती होण्याचे टळले. ते फक्त मालगाडीच्या लोकोपायलटच्या प्रसंगावधामुळे. त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले.

याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी ( दि. ८) सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी व लोणी स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काही लोक चालत होते. यामध्ये काही लोक आरामात ट्रॅकवर सामान घेऊन बसले होते, तर काही जण सामान घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत होते. त्याचवेळी एक मालगाडी उरुळीवरून पुण्याला निघाली होती. रेल्वे ट्रॅकवरून काही नागरिक चालत जात असल्याचे त्या मालगाडीच्या लोकोपायलटतच्या काही अंतरावर असताना निदर्शनास आले. त्यामुळे त्या लोकोपायलटने प्रसंगावधान राखत हॉर्न वाजवून मालगाडीचे इमर्जन्सी ब्रेक दाबले. त्यामुळे ती मालगाडी या लोकांपासून १०० ते १५० मीटर दूर अंतरावर थांबली.

या घटनेची माहिती तत्काळ रेल्वे नियंत्रण कार्यालयास कळविण्यात आली. त्यानंतर संबंधित लोकांना रेल्वे ट्रॅक पासून दूर हटविण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले की, रेल्वे मार्गाचा चालण्यासाठी वापर करू नका. कारण रेल्वे मार्गावर गाड्यांची ये जा सुरू असते.असे आवाहनही त्यांना करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा