राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई, १५ मे २०२३: अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये शनिवारी दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यावरून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. दंगली घडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर अद्दल घडवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आज माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राडा झालेल्या दोन्ही ठिकाणी शांतता आहे. काही लोकांकडून जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र राज्यात दंगली घडवू देणार नाही. दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, अशा इशारा गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रेतेबाबतचा निर्णय लवकर घ्यावा अन्यथा रस्त्यावरुन फिरु देणार नाही, असा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, जे काही चालले आहे ते कोणत्याही लोकशाहीत चालणार नाही. विधानसभा अध्यक्ष कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाही. ते योग्य निर्णय घेतील. आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा