गोल पोस्ट इतर राजकारण जे मौन होते तेच मणिपूरवर राजकारण करतायत, कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान मोदींवर...

जे मौन होते तेच मणिपूरवर राजकारण करतायत, कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३: मणिपूर हिंसाचारावर जे मौन आहेत, शांत आहेत तेच राजकारण करत आहेत, अशी टीका ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. विरोधक मणिपूर हिंसाचारावरुन राजकारण करत असल्याची टीका अविश्वास ठरावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीवर केली होती. यानंतर सिब्बल यांनी पीएम मोदी यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. यासंदर्भातील ट्विट राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून केले आहे.

सिब्बल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विरोधक मणिपूर हिंसाचारावरुन राजकारण करत आहेत, ही मोदींनी केलेली टीका चुकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून मणिपूरमधील महिंलावरील हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. अशी घटना संवैधानिक लोकशाहीत अस्वीकार्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याची आठवण, कपिल सिब्बल यांनी केलेल्या ट्विटमधून करुन दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version