कोल्हापूर, इचलकरंजीत हजारो हिंदूंचा हुंकार

7

इचलकरंजी, २६ डिसेंबर २०२२ : लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशाविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कायदा करावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भगवा ध्वज, भगव्या टोप्या यामुळे इचलकरंजीत अक्षरश: भगवे वादळ अवतरले होते. तर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडण्यात आला. राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मुख्य मार्गावरून हा मोर्चा गांधी पुतळा येथे मार्गस्थ झाला. या मोर्चात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

इचलकरंजीसह पंचक्रोशीतील नागरिक, महिला, युवती, मुली मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा मुख्य मार्गावरून शिवतीर्थ येथे आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चा महात्मा गांधी पुतळा चौकात आला. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर